ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गुलमोहर रोड वर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

अहिल्यानगर

गुलमोहोर रोडवर कोहिनूर मंगल कार्यालयासमोर भटके कुत्रे गाडीला आडवे आल्याने दोन युवती जखमी झाल्या. याच परिसरात मोकाट कुत्र्यांनी तीन वर्षांच्या बालकावर हल्ला केला. नागरिकांच्या सतर्कतेने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. केडगाव सोनेवाडी रोड परिसरातील सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. रात्रीच्या वेळी तर शहर व उपनगरात कुत्र्यांच्या झुंडींमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो आहे. शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. अशा वेळी मनपा प्रशासन, विशेषतः मनपा आयुक्त यशवंत डांगे हे फक्त पाणी पट्टी दरवाढ तसेच इतर कामांत व्यस्त आहेत. नागरिकांकडून कर जरूर घ्या पण त्यांना मुक्त वातावरणात राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली पाहिजे.

भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मनपा फक्त कागदी घोडे नाचवत आहे. आयुक्त साहेबांनी सोशल मिडिया, प्रसारमाध्यमांवरील चमकोगिरी थांबवून प्रत्यक्ष फिल्डवर काम करून दाखवले पाहिजे. अन्यथा तुमच्या दालनासह महापालिकेच्या आवारात भटकी कुत्री सोडून आंदोलन केले जाईल असा आक्रमक इशारा माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे.

लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने अहिल्या नगर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या कडे सर्व अधिकार आहेत. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. परंतु त्यांची कडक शिस्त मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना दिसून येत नाही. मोकाट कुत्र्यांमुळे शहर व उपनगरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून येताना नगरकरांना चोर, दरोडेखोरांपेक्षा कुत्र्यांची भीती वाटते.

आयुक्त साहेब अनेक वेळा रस्त्यावर उतरून कामे मार्गी लावतात. त्याची योग्य प्रसिद्धी होईल अशी व्यवस्था केली जाते. आयुक्तांनी एकदा कोणताही लवाजमा न घेता शहर किंवा उपनगरात एकट्याने रस्त्यावर फिरून दाखवावे. म्हणजे त्यांना मोकाट कुत्र्यांची दहशत दिसून येईल.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाने कोणालाही काम द्यावे. तुमच्या पातळीवर निविदा प्रक्रिया राबवा परंतु हा उपद्रव बंद करावा. पाणीपट्टी दरवाढ करण्यासाठी तुम्ही खूप तत्परता दाखवली. तीच तत्परता नगरकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दाखवली तर तुमचे कौतुकच होईल. येत्या आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही कुत्री पकडून आणून महापालिकेच्या आवारात सोडू असा इशारा मनोज कोतकर यांनी दिला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे