दादा चौधरी मराठी शाळेतर्फे अमृत महोत्सव वर्षानिमित्त आंतर शालेय स्पर्धेचे आयोजन
अहिल्यानगर

हिंदसेवा मंडळाची,दादा चौधरी मराठी शाळेतर्फे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २०२४-२५ आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेली ‘हिंद सेवा मंडळ या संस्थेची व सेनापती दादा चौधरी यांच्या विचारांचा वारसा घेवून समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांशी शैक्षणिक कार्य करणारी शहरातील सन १९५० साली स्थापन आलेली ‘दादा चौधरी मराठी शाळा”आहे.
दादा चौधरी मराठी शाळेच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना शहर व जिल्ह्यातील बालवर्ग व इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अमृतमहोत्सवी आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचा कालावधी 21 जानेवारी ते 27 जानेवारी असा आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा, श्लोक पाठांतर, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कथाकथन ,सूर्यनमस्कार (सांघिक गटाप्रमाणे) स्पर्धा संपन्न होणार आहेत.
तरी या स्पर्धेत शहरातील व जिल्ह्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.
या स्पर्धेसाठी दिली जाणारी पारितोषिके पुढीलप्रमाणे
चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रू.701,द्वितीय क्रमांक -रु.551,तृतीय क्रमांक -351 स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ,तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक,कथाकथन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक- रुपये 701, द्वितीय क्रमांक- रुपये 551,तृतीय क्रमांक -रूपये 351 व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक, सूर्यनमस्कार ( सांघिक) प्रथम क्रमांक- रुपये 3001, द्वितीय क्रमांक रुपये 2001,तृतीय क्रमांक-रूपये 1001,उत्तेजनार्थ-रुपये 301 स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.सर्व स्पर्धांसाठी प्रवेश निशुल्क आहे.
स्पर्धेसाठी नावे पाठवण्याची अंतिम मुदत सोमवार दिनांक 20 जानेवारी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.अशी माहिती स्पर्धा प्रमुख तथा दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांनी दिली आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक – 9552 862909, 7821915896, 7498765126, 8766797039 या क्रमांकाशी संपर्क साधावा.