
AR न्यूज मिडिया हे एक डिजिटल व्यासपीठ आहे जे खास महिलांसाठी कार्यरत आहे. या व्यासपीठाची स्थापना मुख्य संपादिका श्रुती मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे..आणि ते विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी एक संधी प्रदान करते.
AR न्यूज मिडियाचे वैशिष्ट्ये:
1. महिलांसाठी विशेष व्यासपीठ – AR न्यूज मिडिया हे एकमेव न्यूज चॅनेल आहे जे फक्त महिलांसाठी गेले अडीच वर्षापासून काम करते. हे चॅनेल महिलांच्या व्यवसायाची जाहिरात, मुलाखती, आणि त्यांच्या यशोगाथा प्रसारित करते.
2. विशेष पुस्तिका – AR न्यूज मिडियाच्या पोर्टलवरून आपण विविध सण आणि विशेष प्रसंगी विशेष पुस्तिका प्रकाशित होत असतात. जसे की १५ ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दिवाळी विशेषांक.
3. व्यवसायासाठी सुवर्ण संधी – महिलांना व्यवसाय प्रसिद्धीसाठी AR न्यूज मिडिया विविध माध्यमांतून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. विशेषतः महिला व्यावसायिकांसाठी जाहिराती प्रसिद्ध करून वेगवेगळे व्यवसायिक प्रदर्शन आयोजित करून महिलांना मदत करते. तसेच महिलांच्या कार्यक्रमात मिडीया पार्टनर म्हणून काम केले आहे.
4. सन्मान सोहळे आणि पुरस्कार – AR न्यूज मिडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो. यामध्ये ८ मार्च ला गेल्या वर्षी श्रुती मॅडम नी १०० महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने २०२४ ला आयोजित भव्यदिव्य सन्मान सोहळ्याचा समावेश आहे. श्रुती मॅडम यांचा ही विविध स्तरांवर सन्मान देखील झाला आहे.
5. सामाजिक योगदान – AR न्यूज मिडिया महिलांना मार्केटिंग कसे करावे, कोणता व्यवसाय निवडावा याबद्दल मार्गदर्शन करते. त्यांनी अहमदनगर, टाकळी ढोकेश्वर, लोणी, प्रवरा, खडकी खंडाळा, बुलढाणा, जिल्ह्यातील तसेच छोटे छोटे गावांतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या सर्व सेवांमुळे, AR न्यूज मिडिया महिलांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे, जे त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देते आणि त्यांना त्यांच्या यशाकडे नेण्यासाठी मदत करते.