ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

महिलांनी स्वावलंबी बनावे त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी असे शॉपिंग महोत्सव होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन – माननीय राणीताई लंके

अहमदनगर

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी आणि AR न्यूज चॅनेल च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन – बोज्जा यांनी श्रावण शॉपिंग महोत्सवाचे केलेले आयोजन पाहून मला खूप आनंद होत आहे.

असेच महोत्सव होत रहावेत व महिलांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्व प्रकारच्या संधी मिळाव्यात .यासाठी मी मदत करत राहील तुम्ही मला कधीही हाक द्या मी तुमच्या बरोबर आहे महिलांनी स्वावलंबी बनावे त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी असे शॉपिंग महोत्सव होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन माननीय राणीताई लंके यांनी कोहिनूर मंगल कार्यालय येथील श्रावण शॉपिंग महोत्सव 2024 च्या उद्घाटन प्रसंगी केले.

नगरकरांचा राखी पौर्णिमेसाठी खरेदीचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या श्रावण शॉपिंग महोत्सव 2024 या महोत्सवाचा अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे शानदार प्रारंभ झाला.

या महोत्सवाचे उद्घाटन माननीय राणीताई निलेश लंके व माननीय मीनल ताई महेंद्र गंधे यांच्या हस्ते फीत कापून व गणेश पूजनाने झाले.

एका छताखाली अनेक उत्पादने देणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारच्या राख्या महालक्ष्मी सजावटीचे साहित्य ड्रेस मटेरियल ज्वेलरी गिफ्ट आर्टिकल्स मसाले व आयुर्वेदिक प्रॉडक्ट असे शंभरहून अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत तसेच येथे तुम्ही खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेऊ शकता शनिवार 3 ऑगस्ट व रविवार 4 ऑगस्ट या दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवास पहिल्याच दिवशी दिवसभर ग्राहकांनी गर्दी केली होती .

या शाॅपिंग महोत्सवाची संकल्पना श्रुती बत्तीन बोज्जा यांची असून त्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

या उदघाटन सोहळ्याला रो छायाताई फिरोदिया रो वैशाली कोलते , रो नीना मोरे रो आशाताई फिरोदिया , रो ज्योती गांधी, रो लता भगत , रो शुभा बोगावत , रो मुदगल रो डाॅ प्रियांका गांधी सेक्रेटरी स्वाती गुंदेचा व प्रेसिडेंट मिनल बोरा उपस्थित होते .

तसेच सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्स चे संचालक मा ईश्वर बोरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो विभा तांबडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे