ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विश्व निर्मल फाऊंडेशन शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा तर सचिव पदी डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर

अहमदनगर

किड्स सेकंड होम सहज पब्लीक स्कुल चे नविन कार्यकारिणीची निवड

प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल चे झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अध्यक्ष पदी सामजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, सचिवपदी डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत रोहोकले, सह सचिवपदी संदिप ठोंबरे व कोषाध्यक्षपदी संदिप गांगर्डे सर यांची पदाधिकारी म्हणुन निवड करण्यात आली तर संचालक पदी मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, सौ. रुपाली रोहोकले, सौ. स्वाती पारगावकर, सौ. राणी ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी संस्थेचे सचिव डॉ.पारगावकर यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करून मीटिंग ला सुरुवात केली व अजांड्या वरील विषया नुसार नविन पदाधिकारी व संचालक यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळे बाबत माहिती देतांना सांगितले की, आपण शाळा स्थापन करतांना सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो या उद्देशाने कोणताही स्वार्थ न ठेवता कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त सवलती विदयार्थ्यांना कसे देता येईल हा उद्देश ठेवून सुरूवात केली असून लवकरच संस्थेच्या स्वमालकीची जागा घेण्याचा प्रयत्न असून शाळेत 1 ली ते 4 थी पर्यंत चे शिक्षण सुरु करण्याचा माणस असल्याचे सांगितले.

या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थिती बाबत माहिती देवून ताळेबंद पत्रक वाचन केले. शेवटी आभार संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले यांनी मानले.

सभे मधे अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे प्रगती बाबत आनंद व्यक्त केले व नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे