ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंढरपुरात भाविकांची मांदियाळी,१ लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे मुख दर्शन

कार्तिकी सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. पंढरपुरात  दाखल भाविकांनी कार्तिकी एकादशी आणि आजच्या द्वादशीला दुपारपर्यंत सुमारे एक लाख ७ हजार भाविकांनी विठुरायाचे मुख दर्शन घेतले. तर ५२ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले.

कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भक्तीचा महापूर आला होता. यंदाच्या कार्तिकी सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. शासकीय महापूजे दरम्यान मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. सुमारे एक लाख सात हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले.

सरासरी एक मिनिटामध्ये ३५ भाविकांनी देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. वारी काळात भाविकांची संख्या मोजणीसाठी काऊंटींग सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे