
राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. तिथे प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला होता.
या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उद्धव गटाने टीका केली. ‘शिंदेंनी हिंदुत्वासाठी काय काम केलं ?’ गद्दारांना हिंदुहृदयसम्राट बोलण्याची नवी परंपरा आहे का ? अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
प्रचार फलकावर शिंदेंचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख
विरोधकांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री शिंदे