ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा ‘हा’च उमेदवार फायनल असणार

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा जागेला अनन्यसाधारण महत्व आले आहे. भाजपचे उमेदवार खा. सुजय विखेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा सुरु आहे. विशेषतः राष्ट्रवादीबाबत जास्त चर्चा आहे.

याचे कारण म्हणजे ही जागा राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) कडे आहे. त्यामुळे मध्यंतरी समोर असणारे आ. लंके यांचे नाव मागे पडले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून कोण उभे राहणार याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

परंतु आता दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) कोण उमेदवार असणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मात्र मोठं स्पष्टीकरण एका माध्यमाशी बोलताना दिल आहे. त्यांनी राजकीय गणितच समोर मांडले आहे.

ते म्हणाले की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार कुटुंबातीलच उमेदवार असणार हे निश्चित आहे. शरद पवार गटाकडून आमदार नीलेश लंके यांचे नाव घेण्याचे कारण आता उरलेले नाही, कारण ते अजित पवार गटात आहेत असही त्यांनी सांगून टाकलं आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार अर्थात राष्ट्रवादीनेच लढवलेला आहे. त्यामुळे 2024 मध्ये देखील लोकसभेची नगर दक्षिणची जागा त्यांच्याकडेच असणार आहे. व तेथील उमेदवार शरद पवारच निश्चित करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे