अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांवर लागणार 4 क्यूआरकोड.. रेशन कार्डमध्ये नाव जोडणे व इतर कामे आता फक्त एका क्लिकवर
अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी पुरवठा विभागाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता रेशन कार्ड मधील नाव कमी करणे नवीन नाव जोडणे यांसारखे अनेक कामे घरबसल्या करता येणार आहेत.
खरे तर महाराजस्व अभियानाचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि या तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहेत.
यात स्वस्त धान्य दुकानात हक्काचे धान्य मिळते का, रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का, ग्राहकाला आलेला अनुभव क्यूआर कोडच्या माध्यमातून शासनाला कळवला जाणार आहे.
यासोबतच रेशन कार्ड मधील नाव कमी करणे नाव जोडणे ही कामे सुद्धा आता घरबसल्या होणार आहेत. यासाठी रेशन दुकानावर चार प्रकारचे क्यू आर कोड लावले जातील अशी माहिती समोर आली आहे.
नक्कीच हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायी राहणार आहे..




