ब्रेकिंगमहाराष्ट्र
विदर्भात पुढील दोन दिवस गारपिटीचा इशारा
मराठवाड्यातही कोसळणार पावसाच्या सरी, उर्वरित भागांत उन्हाचा चटका वाढणार..

2 दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता आणखी दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. एवढेच नव्हे तर काही जिल्ह्यांत गारपिटीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील उर्वरित भागांत तापमानाचा पार वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. तसेच विदर्भात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.