ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

हॉटेल राजयोगमध्ये वेश्या व्यवसाय उघड..अक्षय अनिल कर्डिले ला अटक

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील खंडाळा येथे असलेल्या हॉटेल राजयोगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत योजनाबद्धपणे कारवाई केली. पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

या पथकात पोसई तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अरुण गांगुर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, भगवान थोरात, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांचा समावेश होता. त्यांना खास सूचना देऊन खंडाळ्यातील संशयास्पद हालचालींची चौकशी करण्यास पाठवण्यात आले.

06 जून 2025 रोजी पथकास माहिती मिळाली की, अक्षय अनिल कर्डिले नावाचा युवक हॉटेल राजयोगमध्ये महिलां करवी वेश्याव्यवसाय चालवत आहे.

माहितीच्या पडताळणीसाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे (AHTU, अहिल्यानगर) यांना संलग्न करून पथकाने छाप्याची योजना आखली. खात्री करण्यासाठी एक पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठवण्यात आला. खात्री झाल्यानंतर हॉटेलवर छापा टाकण्यात आला.

पथकाने हॉटेलवर छापा टाकताच नेपाळमधील कोहलपूर येथील नारायण ठाणप्रसाद भटुराई (वय 27) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रोख 1,500 रुपये जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान, हॉटेलमधील एका खोलीत तीन महिला आढळून आल्या. विचारपूस केल्यानंतर त्या महिलांनी स्पष्ट केले की, अक्षय कर्डिले यांनी त्यांना या व्यवसायात भाग घ्यायला लावले असून, ग्राहकांकडून पैसे घेऊन काही रक्कम त्यांना देण्यात येते आणि उर्वरित पैसे कर्डिलेकडे ठेवले जातात.

अक्षय अनिल कर्डिले (वय 28) यास तात्काळ शोधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन जप्त करण्यात आला, जो तपासासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकारामुळे तो व भटुराई हे दोघे मिळून महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून त्यावर आपली उपजीविका करत असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 487/2025 नोंदवण्यात आला आहे. गुन्हा ‘स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा 1956’ (PITA Act) अंतर्गत कलम 3, 4, 5, 6, आणि 7 नुसार नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलीस स्टेशनद्वारे सुरू असून, अधिक तपासात आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रशांत खैरे, आणि नगर ग्रामीण उपविभागाचे अति. कार्यभार अधिकारी मा. श्री. अमोल भारती यांच्या सूचनेखाली व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे