ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारे टोळी वडवणी पोलिसांनी केली गजाआड

अहिल्या नगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

जून 2025 रोजी वडवणी पोलीस स्टेशन येथे मनीषा नरेंद्र ननावरे वय 25 वर्षे राहणार संगमनेर, ही तिची मैत्रीण वैभवी राम शेटे राहणार, संगमनेर,अहिल्यानगर हिला घेऊन आली व तिने पोलिसांना माझ्या मैत्रिणीला तिचे घरच्यांनी डांबून ठेवले होते व मी तिला सोडवले अशी हकीकत कथन केली..

सुरुवातीला महिला अधिकारी या नात्याने वडवणी प्रभारी API वर्षा व्हगाडे यांनी वैभवी व मनीषा हिची व्यवस्थित प्रेमाने चौकशी केली.. तसेच सोडवणूक करणाऱ्या ड्रायव्हरला देखील बोलवून घेतले, परंतु या तिघांनाही बोलवून घेतल्यानंतर तींघांची स्वतंत्र चौकशी केली असता मनीषाचे दोन दिवसापूर्वी नुकतेच गणेश बंडू घाडगे व 28 वर्षे राहणार उपळी, वडवणी या तरुणाशी लग्न झालेले असून त्यांनी सध्या लग्नासाठी मुली मिळत नाही आजारासाठी मनीष्याच्या मावशीला व तिच्या काकाला त्यांनी तीन लाख रुपये नगदी दिले असे कळाले, तसेच मनीषा कडे वेगवेगळे आधार कार्ड असून तिचे काका व मावशी हे देखील नकली असल्याचे समजले, लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक गरीब सर्वसाधारण,तसेच प्रतिष्ठित कुटुंबांना अशांचा शोध घ्यायचा, लग्न होत नसल्या तरुणांना सुंदर मुलगी दाखवणे,नंतर तिच्या आईला कॅन्सर झाला आहे, किंवा तिला आई-वडीलच नाहीत किंवा इतर आर्थिक अडचण सांगून पैसे उकळणे, व पुन्हा पैसे घेवुन पळून जाणे किंवा पळून जायला जमले नसल्यास त्याच कुटुंबा विरुद्ध पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल करणे, आणि अशावेळी त्या कुटुंबाने फसवणुकीच्या तक्रारीबाबत माघार घेणे, मी पुन्हा नवीन ग्राहक शोधणे, अशी या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत आहे.

रणजीत अहिरे या आरोपीच्या MH-17AE 2889 मारुती सुझुकी या गाडीचा मुलगी दाखवण्यासाठी तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापर करत असे, यामध्ये आतापर्यंत वडवणी पोलिसांनी 1)वैभवी शेटे( नवरी), 2) मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण) 3) रणजीत अहिरे( ड्रायव्हर) तिघेही राहणार संगमनेर अहिल्यानगर व 4)यमुनाबाई शिंदे,( मध्यस्थी) यांना अटक केली..

यात एकाच नावाचे विविध आधार कार्ड, व एक चार चाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त आहे.तरी अशा प्रकारचे प्रकरणे आल्यास त्याला बळी लग्न जुळवण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नये असे आव्हान बीड पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

ही कारवाई अधीक्षक नवनीत कावत व अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणीच्या प्रभारी अधिकारी Api वर्षा व्हगाडे, psi संजय राठोड, psi राजू राठोड, पुरुष अंमलदार विलास खरात, अविनाश गवळी व महिला पोलीस सुवर्णा खोसे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे