ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ST बस थेट अयोध्येला जाणार, महाराष्ट्रातील भाविकांना होणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन

अयोध्येतील राम मंदिरासाठी एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाविकांचा अयोध्या प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.

प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात ST बस थेट अयोध्येला जाणार आहे. एसटी महामंडळातर्फे अयोध्येसाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या मुळे महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार आहे.

22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिर खूपच सुंदर आहे. देशभरातून भाविक अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विविध राज्यातून अयोध्येकरिता खास रेल्वे ट्रेन देखील सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रात रेल्वे सह अयोध्येकरिता एसटी बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे.

धुळ्यापाठोपाठ आता पुण्यातून देखील अयोध्येसाठी एसबस सेवा सुरु करण्यात आली आहे.

एकत्र ग्रुपने अयोध्येला जाण्याचे प्लनिंग करणाऱ्यांसाठी चांगली योजना आहे. ग्रुपसाठी एसटी बस बुक करता येणार आहे. 45 ते 55 जणांचा एक समूह एकत्र प्रवास करत असेल तर एसटीबस सोडली जाणार आहे. भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी एसटीने हा उपक्रम हाती घेतला आहे.

पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार एटी बसेस सोडल्या जाणार आहेत. 50 जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटीची पाहिजे ती बस भक्तांना मिळू शकणार आहे. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रती किलोमिटर 56 रुपये भाडे आकारले जाईल. या यात्रेच्या दरम्यान 3 ते 4 मुक्काम असतील. यामुळे 2 ते 3 चालक या बस साठी दिले जातील असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे