ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भाजपला मोठा धक्का, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बड्या नेत्याने ठोकला पक्षाला राम राम

अहमदनगर

आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नसल्याचे दिसून येत आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतरही मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी भाजपला राम राम ठोकला आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही पवार म्हणाले. त्यामुळे एकनाथ पवार यांच्या भूमिकेविषयी भाजप काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे