ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना

अहमदनगर

सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पांचे आगमन झाले. विशाल गणपती हे नगरचे ग्रामदैवत आहे. प्रत्येक नगरकराचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही विशाल गणपतीची राज्यभरात ख्याती आहे. येथील पारंपरिक गणेशोत्सव सर्व गणेशभक्तांचे आकर्षण असतो. गणरायाच्या कृपेने प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होवो, अशा शुभेच्छा आमदार संग्राम जगताप यांनी गणेशोत्सवानिमित्त नगरकरांना दिल्या.

मंगळवारी सकाळी शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री विशाल गणपती मंदिरात श्रींच्या प्रतिष्ठापना पूजेस उपस्थिती लावून आमदार जगताप यांनी दर्शन घेतले. आमदार जगताप म्हणाले,

गणपती हे बुध्दीचे दैवत आहे. विघ्नहर्ता, सुखकर्ता प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. गणेशोत्सव ही आपल्याला मिळालेली मोठी परंपरा आहे. धार्मिक सण उत्सवांतूनच आपण एकत्र येतो, एकमेकांशी संवाद, सौहार्द वाढतो. असा अतिशय मोठा सांस्कृतिक, धार्मिक वारसा आपल्याला लाभला आहे हे आपल्या प्रत्येकाचेच भाग्य आहे.

सर्व नगरकर अतिशय उत्साहात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करीत असून पुढील दहा दिवस सर्वत्र उत्साहात उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही उत्सवाची मोठी तयारी केली असून आबालवृध्दांना भावतील असे देखावे गणेशभक्तांना पहायला मिळणार आहेत. एकूणच सर्वत्र मांगल्य घेऊन आलेल्या गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येकाने मनमुराद घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे