अहिल्यानगर मधील मातोश्री वृद्धाश्रमातील सहकाऱ्यानेच केला हल्ला..

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात वृध्दाश्रमामध्ये हत्याराने हल्ला झाल्याची घटना घडली. यांमध्ये दोघांचा मृत्यू झाला.
एमआयडीसी परिसरातील विळद घाट परिसरामध्ये असलेले मातोश्री वृद्धाश्रम येथे वास्तव्यास असलेल्या एकाने आपल्याच सोबतच्या सहकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यामध्ये दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला तर या हल्ल्यांमध्ये सहा जण गंभीर जखमी झालेल आहेत.
प्रकृती चिंताजनक
जखमींना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असून एखादी प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल होत या घटनेची तपासणी सुरू केली आहे.
वृध्दाश्रमात हल्ला
ज्या हत्याराने दोन वृद्धांना मारहाण करण्यात आली ते देखील हस्तगत करण्यात आले असून पोलीस अधिक तपासणी करत आहे. मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी राजू घुले नामक एका व्यक्तीने पहाटे सहाच्या सुमारास वृद्धाश्रमातील काहींवर हल्ला केला या घटनेमध्ये दोघाजणांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहे.
घटनेची प्राथमीक चौकशी सुरू
जखमी वरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून ही घटना नेमकी का घडली याची प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांनी दिली आहे.
घडल्या प्रकारात सहाजण जखमी
दरम्यान या मारहाणी मध्ये दोघांचा मृत्य झाला. असून महकाळेश्वर बाबुराव हेणे वय वर्ष ६० आणि दत्तात्रेय शंकर हारके वय ८५ असे मयतांचे नाव आहे.
तर यामध्ये सहा जण जखमी झाले असून गणेश छबु घोडके 60, बाळासाहेब अंबादास घाडगे 67, गोरख नारायण फुंदे – 75, साहेबराव दगडू भवर 63, लिंबराज दामोदर पिस्के 80, संतोष ब्रिंगल – 60 असे जखमींचे नाव आहे.
दरम्यान मधील एक जणची नाजूक अवस्था असून त्यावर देखील उपचार सुरू आहे.




