ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहिल्यानगरमधील भिंगार येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिपक वागस्कर यांच्या कुटुंबियांची खासदार निलेश लंके साहेबांनी भेट घेतली.
अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील भिंगार येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिपक रामकिसन वागस्कर यांचे निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वागस्कर कुटुंबीयांचे सांत्वन लंके साहेबांनी केले.
दिपकजींच्या अकाली निधनाने वागस्कर परिवारावर मोठा आघात झाला आहे. या दुःखाच्या प्रसंगी मी वागस्कर परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.असे साहेबांनी सांगितले आहे..
या संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी माझी ठाम मागणी आहे. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. वागस्कर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत.
दिवंगत दिपकजींना भावपूर्ण श्रद्धांजली.. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.




