ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहिल्यानगर महापालिकेचे थकबाकीदार रडारवर, दोन हजार जणांना जप्तीच्या नोटिसा
अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेने २७५ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर थकबाकीच्या वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कर न भरणाऱ्या २,००० थकबाकीदारांना पहिल्या टप्प्यात जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, उर्वरित मालमत्ताधारकांवरही ही कारवाई सुरू आहे.
थकबाकीदारांमध्ये शासकीय कार्यालये, व्यावसायिक गाळे, मोबाईल टॉवर्स आणि मंगल कार्यालयांचा समावेश आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी यापूर्वी कर सवलत देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने, आता मालमत्ता जप्त करणे आणि नळजोडणी खंडित करणे यांसारखी कठोर कारवाई केली जाणार आहे.



