ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

2 कोटींच्या कर्जापोटी 18 कोटींची मागणी सुरेश मोतीलाल कांकरिया आणि विनय गुरुलिंग होनराव यांना अटक

अहिल्यानगर

जमीन बळकावून अवाजवी व्याजाची मागणी; अवैध सावकारी करणारे दोघे जेरबंद..तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर मधील तारण ठेवलेली जमीन परत न करता अवाजवी व्याजाची मागणी करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

सुरेश मोतीलाल कांकरिया (वय ६४, रा. विराज कॉलनी, तारकपूर) आणि विनय गुरुलिंग होनराव (वय ५५, रा. होनराव वाडा, डावरे गल्ली, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी दत्तात्रय जगन्नाथ आगरकर (वय ७७, रा. आगरकर मळा, रेल्वे स्टेशन शेजारी) यांनी सन २०१६ पासून वेळोवेळी स्वतःची जमीन तारण ठेवून कांकरिया यांच्याकडून २ कोटी रुपये व्याजाने घेतले होते.

फिर्यादीने आतापर्यंत ३ कोटी ७५ लाख रुपये मुद्दल व व्याजापोटी परत केले. तरीही आरोपींनी तारण जमीन परत न करता फसवणूक करत अवैधरीत्या व्याजावर व्याज लावून तब्बल १८ कोटी ३८ लाख १४ हजार ६९५ रुपयांची मागणी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे