ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर माळीवाडा परिसरात दुकानात गेलेल्या महिलेचा विनयभंग

अहिल्यानगर

अहिल्यानगर  मधील माळीवाडा परिसरात दुकानात बॅग घेण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सद्दाम नावाच्या (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भिंगार उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी माळीवाडा परिसरातील संबंधित व्यक्तीच्या दुकानात बॅग घेण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी आरोपीने फिर्यादीला उद्देशून, तू खूप भारी दिसतेस, असे म्हटले. त्यावर फिर्यादीने तुम्ही नीट बोला, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीचा हात ओढून गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर महिलेने कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे