ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात कडकडीत बंद

पालिका कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने आज अहिल्यानगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी ही हाक देण्यात आली होती.

या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे शहरातील माळीवाडा, तोफखाना, भिंगार, केडगावसह प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. एसटी, ऑटो आणि खाजगी वाहतूकही ठप्प राहिली.

धीरज परदेशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा द्यावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे