ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

पुणे

तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेच्या उपशिक्षिका रूपाली अनिल ढमढेरे यांना ‘दिनमित्रमधील अग्रलेखांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयावरील संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेतील उपशिक्षिका रूपाली अनिल ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी “दिनमित्रमधील अग्रलेखांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास” (इ.स. १९१० ते १९३० या कालखंडाच्या संदर्भात) या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. हे संशोधन प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर संशोधन केंद्रामार्फत पूर्ण केले आहे.

या संशोधनासाठी प्रा. डॉ. वसंत रघुनाथ शेंडगे यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. पीएच.डी पदवीसाठी सासरे विजय ढमढेरे, पती अनिल ढमढेरे, प्रा.संदीप सांगळे, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे नातू उत्तमराव पाटील तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे रूपाली ढमढेरे यांनी सांगितले.

रूपाली ढमढेरे यांनी मराठी विषयात पदवी घेतली असून, त्या सध्या माध्यमिक विभागाकडे अध्यापन करतात.माध्यमिक शाळातील उपशिक्षक अल्प प्रमाणात पीएच.डी पदवी मिळवितात. अतिशय कष्ट व अभ्यासू वृत्तीने संशोधन करून रूपाली ढमढेरे यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रूपाली ढमढेरे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्यानंतर ग्रामस्थांतर्फे तसेच शिक्षण संस्थेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे