ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आम्ही मोबाईल वापरणार नाही- भिंगारच्या नवीन मराठी शाळेतील चिमुकल्यांचा संकल्प..

अहिल्यानगर

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि मानसिक विकासावर होत असलेल्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील नवीन मराठी शाळेने ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केला होता.

या उपक्रमाचा प्रभाव इतका झाला की पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आम्ही मोबाईल वापरणार नाही, असा संकल्प केला आहे.

पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारा चिडचिडेपणा, अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, वेळेचा अपव्यय, मैदानी खेळांपासून वाढणारे अंतर, तसेच डोळे व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, यावर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. सोप्या भाषेतील संवाद आणि वास्तववादी प्रसंगांमुळे विद्यार्थ्यांवर या नाटिकेचा सकारात्मक परिणाम झाला.

नाटिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्याची, अभ्यास, वाचन, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना अधिक वेळ देण्याची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव आणि दृढनिश्चय उपस्थितांचे घेत होता. शाळेच्या या उपक्रमाचे शिक्षणप्रेमींनीही कौतुक केले.

मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वा सवय लहानपणापासूनच लागावी, राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला..

शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कळमकर, बालवाडीच्या प्रमुख अर्चना गायकवाड यांनी उपक्रमाचे कौतुक केले. या नाटिकेत कल्याणी धाडगे, शोभा गायके, सुजाता अंगरके, वैशाली विधाते यांनी सहभाग घेतला होता.

मूल्यशिक्षणावर भर.

संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकास व मूल्यशिक्षणाकडे विशेष लक्ष देणे मोबाईलपेक्षा पुस्तक, खेळ आणि महत्त्वाचे असल्याने सातत्याने अन उपक्रम शाळेत राबविले जात अस मुख्याध्यापिका उज्ज्वला कळमकर सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे