आयकॉन पब्लिक स्कूल येथे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर महानगरपालिका व द आयकॉन पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत आयकॉन पब्लिक स्कूल येथे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी महापौर सौ. ज्योती गाडे, आयुक्त श्री. यशवंत डांगे, नगरसेविका सौ. पौर्णिमा गव्हाळे, सौ. गीतांजली काळे, नगरसेवक श्री. सुजय मोहिते, प्रशासन संचालक कर्नल आर. सी. राणा, शैक्षणिक संचालिका सौ. आराधना राणा, विश्वस्त श्री. अमित मुथा, मनपाचे पर्यावरणदूत श्री. सुरेश खामकर, मूर्तिकार श्री. बालाजी वल्लाळ, प्राचार्या सौ. दीपिका नगरवाला तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते.




