ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
बालक मंदिर महिला मंडळ या शाळेमध्ये सर्व चिमुकल्या बाळ गोपाळांनी दणक्यात दहीहंडी साजरी केली.
अहिल्यानगर

बालक मंदिर महिला मंडळ या शाळेमध्ये सर्व चिमुकल्या बाळ गोपाळांनी गोविंदा आला रे आला या गाण्याच्या दणक्यात दहीहंडी साजरी केली..
दहीहंडीमध्ये विविध वृक्षबीजे आणि गोपाळकाला टाकलेला होता. शाळेतील मेंद्रे अश्विनी यांनी विद्यार्थ्यांकडून आनंदी आनंद झाला , छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल अशा विविध प्रश्न गीतांवर नृत्यसादरीकरण करून घेतले .
कान्हा झालेल्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली .दहीहंडीतून बाहेर पडलेली वृक्षबीजे विद्यार्थ्यांनी वेचली . शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाल्यानिमित्त दहीकाला प्रसाद देण्यात आला .

या सणाचे सांस्कृतिक महत्त्व मुख्याध्यापिका सौ असिता शूळ यांनी सांगितले . निरूपमा देशपांडे यांनी कृष्णाची गोष्ट सांगितली . सर्व शिक्षिकावृंदानी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन दहिहंडीचा कार्यक्रम यशस्वीपणे व आनंदात संपन्न केला .




