ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

घराचे कर्ज मिटवण्याच्या नावाखाली तोतया वकिलांकडून दोन लाखांची फसवणूक

अहिल्यानगर

​अहिल्यानगर मधील मुंबई येथील घराचे थकीत गृहकर्ज एकरकमी मिटवून देण्याचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन तरुणाची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तोतया वकिलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अंबादास पवार (वय २०, रा. पोलीस मुख्यालय, सर्जेपुरा, अहिल्यानगर) याच्या सायन कोळीवाडा, मुंबई येथील घराचे बँकेतील गृहकर्ज आर्थिक अडचणींमुळे थकीत होते. दरम्यान, मुंबईतील एका कार्यक्रमात विवेकची ओळख महेश रावसाहेब चव्हाण (रा. वाशी, नवी मुंबई) याच्याशी झाली होती.

​त्यानंतर विवेक कामानिमित्त अहिल्यानगर येथील माळीवाडा बस स्थानक येथे आला असताना, महेश याने त्याला संपर्क साधला. “मी वकील असून तुमच्या घराच्या कर्जाची बँकेसोबत एकरकमी तडजोड करून देतो,” असा बनाव त्याने रचला. या कामासाठी त्याने पैशांची मागणी केली.

​विवेकने त्याच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या तारखांना एकूण दोन लाख रुपये बँक खात्यातून ऑनलाईन पाठवले. पैसे मिळाल्यानंतर महेश याने काम सुरू असल्याचे सांगत सतत वेळ मारून नेली.

​काही दिवसांनी त्याने विवेकचे दूरध्वनी उचलणे बंद केले आणि संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विवेक पवार याने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

पोलिसांनी आरोपी महेश चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे