ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

निंबळक येथे महिला आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात

अहिल्यानगर

महिलांसाठी मोफत ओपीडी व गर्भवती मातांची मोफत तपासणी. गावात शुगर व ईसीजी तपासणीची सुविधा उपलब्ध होणार.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच जागतिक मासिक पाळी स्वच्छता सप्ताहानिमित्त निंबळक येथे विशेष महिला आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. “महिलांचे आरोग्य चांगले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास महिला व किशोरी मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशन आणि सोशल कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे तसेच सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुलभा पवार यांनी मासिक पाळी स्वच्छता, महिलांचे आरोग्य, रक्तक्षय (ॲनिमिया), स्त्रीरोगविषयक समस्या तसेच महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध आरोग्यविषयक आजारांबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्‍यक आरोग्य सल्ला देण्यात आला.

यावेळी आरोग्यविषयक समस्या असलेल्या महिलांना मोफत ओपीडी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गर्भवती मातांची मोफत तपासणी, सर्व रुग्णांची मोफत शुगर तपासणी आणि मोफत ईसीजी तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियंका शेळके (बोबडे), सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे, डॉ. अमित पवार, डॉ. सुमित आबेकर, डॉ. सतीश गेरंगे, ग्रामसेवक रासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी, किशोरी मुली तसेच स्वयंसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे