महाराष्ट्र बंद, काय सुरू अन् काय बंद?

राजधानी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
या बंदला काँग्रेस, डावे पक्ष, विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर्स आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग सेंटर्सनी या बंदला पाठिंबा दिला आहे.अत्यावश्यक सेवा (दवाखाने, मेडिकल, दूध पुरवठा इत्यादी) पूर्णपणे सुरू राहतील.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस आणि लोकल) सामान्यपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे, मात्र निदर्शनांमुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. आंदोलने झाल्यास, वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो आणि रस्ते अडवले जाऊ शकतात.काही भाग आणि बाजारपेठांमध्ये दुकाने ऐच्छिक (स्वेच्छेने) बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील चैत्यभूमीसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही कार्यकर्त्यांवर खबरदारी म्हणून कारवाई करण्यात आली आहे.दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर वरील आंदोलनात दरम्यान आंदोलन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार व अत्याचाराच्या विरोधात बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे शिवसेना ठाकरे गटाचे काँग्रेसचे वंचित चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
कार्यकर्त्यांनी अत्याचाराच्या विरोधात रस्ता रोको केला असून गेल्या एक तासांपासून नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावर कार्यकर्ते तळ ठोकून आहेत सरकार विरोधी ही घोषणाबाजी तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणीच्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून उठला आहे.




