ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पाईपलाईन रोड परिसरातील हाय मॅक्स पोलवर अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेल्या इंटरनेट, टीव्ही व इतर सर्व प्रकारच्या केबल लाईन्स हटविले.

अहिल्यानगर

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे पाईपलाईन रोड परिसरातील हाय मॅक्स पोलवर अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेल्या इंटरनेट, टीव्ही व इतर सर्व प्रकारच्या केबल लाईन्स हटविण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे संभाव्य अपघात, शॉर्टसर्किट तसेच जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यास मदत होणार आहे.

महानगरपालिकेतर्फे सर्व केबल सेवा पुरवठादारांना व संबंधित धारकांना स्पष्ट सूचना देण्यात येत आहे की, महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, हाय मॅक्स पोलवर किंवा इतर शासकीय संरचनेवर अनधिकृत केबल टाकू नयेत. अशा प्रकारच्या अनधिकृत केबलमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो तसेच शहराचे सौंदर्यही बाधित होते.

यापुढेही अशा अनधिकृत केबलविरोधातील मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सातत्याने राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सुरक्षित, सुशोभित आणि शिस्तबद्ध अहिल्यानगर घडविण्यासाठी सर्व नागरिक व केबल सेवा पुरवठादारांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे