स्टेनोग्राफर पद राज्यसरकारने रद्द करू नये – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा
अहिल्यानगर

येणाऱ्या 13 तारखेच्या कॅबिनेट मिटिंग मध्ये राज्य सरकार स्टेनोग्राफर पद रद्द करण्याच्या विचारात असल्याचे बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जर तसे झाले तर अनेक विदयार्थ्यावर अन्याय होईल या करिता स्टेनोग्राफर पद रद्द करू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय अनेक स्टेनोग्राफर शिक्षण झालेल्या विदयार्थ्यांवर अन्याय होणारा व त्यांचे भविष्य अंधारमय होणारा आहे. जर राज्यसरकारला हा निर्णय घ्यायचाच असेल तर अगोदर त्यांनी या शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे, तसेच ज्या संस्था स्टेनोग्राफी चे शिक्षण देतात. त्यांच्याही रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, जर असे झाले तर अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते व अनेक विदयार्थी ज्यांनी स्टेनोग्राफी चे शिक्षण घेतले आहे व जे घेत आहेत त्यांच्यावर अन्याय होणार ते बेरोजगार होतील.
अशा परिस्थिती मध्ये राज्यसरकारने असा कोणताही निर्णय स्टेनोग्राफी पद रद्द करण्याचा घेऊ नये अथवा स्टेनोग्राफी शिक्षण देणाऱ्या संस्था व स्टेनोग्राफी शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांची रोजगारा बाबत तजबीज करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.




