ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माजी महापौर संदीप कोतकर यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला – केडगाव दुहेरी हत्याकांड

अहिल्यानगर

जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा. राज्यात गाजलेल्या केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात माजी महापौर तथा आरोपी संदीप भानुदास कोतकर यांचा दोषमुक्ती (Discharge) अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर यांनी फेटाळून लावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ श्री. शिंदे यांनी २१ जुलै २०२६ रोजी हा आदेश दिला.

या चर्चित दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी संदीप कोतकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर सीआयडीने त्यांच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने आरोपीस जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, दोषारोप निश्चितीपूर्वी आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिक कारागृहात असल्याने त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

मात्र, अभियोग पक्षाने या युक्तिवादास जोरदार विरोध करत तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उपलब्ध पुरावे आणि तपासातील नोंदींचा विचार करून न्यायालयाने आरोपीचा दोषमुक्ती अर्ज नामंजूर केला.

या प्रकरणात शासन पक्षातर्फे अॅड. मंगेश दिवाणे यांनी प्रभावी बाजू मांडली. तसेच मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. उमेशचंद्र यादव, अॅड. समीर पटेल आणि अॅड. सलमान जहागीरदार यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे