ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

साई विशाल पवार याचा पाण्यात बुडाल्यामुळे उपचारापूर्वीच मृत्यू

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्यात बुडाल्यामुळे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.

साई विशाल पवार असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील भारत बेकरीजवळील आंबेडकर चौक परिसरात राहणारा साई पवार हा चिमुकला सोमवारी (20 जुलै) अचानक पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच त्याचे वडिल विशाल वसंत पवार यांनी त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासून साई याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश मोरे करीत आहेत. लहान मुलाने अचानक प्राण गमावल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे