ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरच्या मुख्य बाजारपेठेतील गंज बाजार पोलीस चौकी लवकरच सुरु होणार.

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील मुख्य बाजारपेठेत असलेली आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली गंज बाजार पोलीस चौकी लवकरच दुरुस्त करून पुन्हा सुरू केली जाणार आहे.

२२ जून रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी या चौकीची प्रत्यक्ष पाहणी केली. गंज बाजार हा सराफ बाजार, कापड बाजार आणि डाळ मंडईने वेढलेला अत्यंत गजबजलेला परिसर असल्याने येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. येथील वाढती गुन्हेगारी, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि नागरिकांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी ही चौकी त्वरित सुरू करावी, अशी स्थानिक नागरिक व विविध संघटनांची जुनी मागणी होती.

पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनामुळे लवकरच येथील गैरप्रकारांना आळा बसेल आणि कारवाईची मोहीम तीव्र केली जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे