ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केतन अग्रवालच्या मृत्यूमागे कटाचा संशय, होणाऱ्या पत्नीसह काही जण चौकशीच्या रडारवर

पुणे

अपघाती मृत्यूची शक्यता मागे पडली,पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू, अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा..

पुणे  लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाल्याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात असताना, पोलिस तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याने या प्रकरणाकडे संशयास्पद मृत्यू म्हणून पाहिले जात आहे.

काही माध्यमांमध्ये केतनच्या होणाऱ्या पत्नीवर दरीत ढकलल्याचा आरोप करण्यात आला असून, तिच्या काही मित्रांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

पिंपरी-चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा नोव्हेंबर महिन्यात विवाह होणार होता. राजस्थानमधील उदयपूर येथे शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगड किल्ल्यावर गेले होते. ट्रेकिंग आणि फोटोशूटदरम्यान केतन दरीत कोसळल्याची माहिती सुरुवातीला समोर आली. त्यानंतर बचाव पथकाने जवळपास तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील परिस्थिती तसेच संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असली, तरी या प्रकरणातील कोणत्याही संशयिताविषयी अधिकृत माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांच्या अधिकृत निवेदनानंतरच या मृत्यूमागील नेमके सत्य स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या समोर येत असलेल्या दाव्यांकडे सावधगिरीने पाहण्याची आवश्यकता असून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे