ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या फ्लेक्समुक्त अभियानांतर्गत अनधिकृत फलकांवर कारवाई

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या फ्लेक्समुक्त अहिल्यानगर मोहिमेअंतर्गत प्रभाग समिती क्रमांक १ अंतर्गत श्रीराम चौक रोड (एसबीआय एटीएम समोर), श्रीराम चौक पाईपलाईन रोड, पार्वती कॉर्नर हॉटेल परिसर, भिस्तबाग चौक येथील स्ट्रीट लाईट पोलवरील बोर्ड, सोनानगर चौक येथील कॅमेरावर आडवा लावलेला बोर्ड, समर्थ शाळा उपनगर कुष्ठधाम रोड, प्रोफेसर कॉलनी चौक तसेच नोबल हॉस्पिटल रोडवरील दत्त मंदिर समोरील प्रेमदान हडको कॉर्नर येथे अनधिकृत फलक व बोर्ड हटविण्याची कारवाई करण्यात आली.

तसेच प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत लाल टाकी रोड व पोलीस मुख्यालयाजवळील परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही बोर्ड स्ट्रीट लाईट पोलवर लावलेले आढळून आले, तर काही फलक रस्त्याच्या मध्यभागी व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी संबंधित फलक तात्काळ हटविण्यात आले.

प्रभाग समिती क्रमांक १ व ३ मिळून एकूण १६ अनधिकृत बोर्डांवर कारवाई करण्यात आली असून फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेची ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे