ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये फिल्मीस्टाईल दरोडा, प्रवासी बनून बसले 3 दरोडेखोर, चालकाला बाहेर फेकून Swift कार पळवली

अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील खोसपुरी शिवारात 14 जूनच्या पहाटे उबर चालक विशाल कट्टीमनी यांच्यासोबत थरारक दरोड्याची घटना घडली. पुण्यातून शेवगावकडे तीन प्रवाशांना घेऊन जात असताना एका प्रवाशाने लघवीच्या बहाण्याने गाडी थांबवण्यास सांगितले.

गाडी पुन्हा सुरू होताच आरोपींनी चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांचे हात दोरीने बांधले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी चालकाला चालत्या गाडीतून खाली फेकण्यात आले.

आरोपींनी चालकाची सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि सुमारे 5.70 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार लंपास करून पलायन केले. घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे