ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरसेवक श्रीपाद छिंदमला महापालिकेच्या सभागृहातून बाहेर काढले.

महापालिकेतील अर्थसंकल्पिय महासभेतून आज (ता.२७) शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला महापालिकेच्या सभागृहातून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या रोषानंतर बाहेर काढण्यात आले.

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले. छिंदम याला सभागृहात बोलण्याचा व बसण्याचा अधिकार नाही. त्याला प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा, असे म्हणत सर्व नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला.

अंदाजपत्रकीय चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी बजेटवरील चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, गणेश भोसले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, विकी जगताप यांनी त्याला सभागृहात बसण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली.

भाजपाचे नगरसेवक अमोल येवले यांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे व ठाकरे गटानेही त्याला सभागृहातून बाहेर काढावे, अशी मागणी केली. संपत बारस्कर यांनी छिंदम याला सभागृहात न थांबता बाहेर जाण्याबाबत सांगितले. त्यानंतर काही नगरसेवकांनी आक्रमक होत त्याच्या दिशेने धाव घेतली. सर्वांनी मिळून त्याला सभागृहातून बाहेर काढले.

ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याला सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत कायदेशीर मार्गाने अजेंड्यावर विषय घेऊन निर्णय घ्यावा. यापूर्वीही त्याला त्याचे पद रद्द करून सभागृहातून काढून टाकले होते. याबाबत आता पुन्हा ठराव करण्यात यावा. पुढच्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसेल, तर आम्ही सभागृहात थांबणार नाही, असा इशारा संपत बारस्कर व इतर नगरसेवकांनी दिला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे