ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे महत्त्वाचे विधान – देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाहीये.

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांनी गेल्या ४८ तासांत देशात धुमाकूळ घातला आहे.

या अफवांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक चिंतीत झाले आहे. त्यातच देशातील पेट्रोल आणि गॅस एजन्सीसमोर लोकांच्या रांगाच रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. जरी सरकार पेट्रोल टंचाई नाही असे सांगत असले तरी पेट्रोल पंपांवर मर्यादित पेट्रोल मिळत आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनादरम्यान पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करताना देशवासियांना कोरोनाकाळाप्रमाणे संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या एका विधानाचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियावर लॉकडाऊन लागणार असल्याचे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोकांची एकच धावपळ सुरू झाली होती.असे असतानाच आता केंद्र सरकारने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून देशात कोणताही लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

यावर आज केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाहीये. कोरोना सारखी कोणती परिस्थिती नाहीये असे स्पष्ट केलेय. त्यांनी लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांवर टीका देखील केली. त्यांनी अशा परिस्थितीत अशा अफवा पसरवणे बेजबादार आणि धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री हरिदीप सिंग पूरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘लॉकडाऊनची अफवा पूर्णपणे खोटी आहे. मी स्पष्टपणे सांगतो की केंद्र सरकारच्या विचारात असा कोणताही प्रस्ताव नाहीये. या कठीण काळात आपण शांत राहणे, जबाबदार आणि एकत्र राहणे गरजेचे आहे. अफवा पसरवणे आणि पॅनिक तयार करणे हे बेजबाबदार आणि धोकादायक आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे