गॅस टंचाईच्या काळात नगर शहरात अवैधरित्या गॅस रिफीलिंग, आरोपी जेरबंद
अहिल्यानगर

गॅस टंचाईच्या काळात अहिल्यानगर शहरात गुलमोहर रोड परिसरात घरगुती गॅस टाक्यामधुन अवैधरित्या व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करणा-या आरोपी 33,500/- रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई.
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईच्या काळात गॅस टाक्याची अवैध साठवणुक करुन अवैध्यरित्या व्यवसायीक गॅस टाक्यामधुन रिफीलिंग करणारे ठिकाणांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार, भाग्यश्री भिटे, सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथकाने दिनांक 26/03/2026 रोजी अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलींग करत असतांना पथकास इसम नामे साद खान हा त्याचे गुलमोहर रोड, पारिजात चौक जवळील आम्रपाली गार्डन समोर असलेल्या पत्र्याचे गोडाऊन मध्ये घरगुती गॅस टाक्यामधुन व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करित असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता, सदर ठिकाणी एक इसम घरगुती गॅस टाक्यामधुन व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करत असतांना दिसुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 1) शहानवाज शौकत सय्यद वय -24 वर्षे रा. दर्गा दायरा जवळ, दगडी चाळ, मुकुंदनगर, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील इसमाच्या कब्जातुन 11,000/-रु कि.चे 10 एच.पी. कंपनीच्या गॅस टाक्या, 20,000/-रु कि.चे दोन इलेक्ट्रीक मोटार मशीन, 2500/-रु कि.चे 05 लाल रंगाच्या गॅस टाक्या 05 कि.लो वजनाच्या असा एकुण 33,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमास सदरच्या गॅस टाक्या कोठुन आणल्या तसेच रिफीलींग कोणाच्या सांगण्यावरुन करत असले बाबत विचारपुस करता त्याने साद अन्वर खान रा. घासगल्ली मुकुंदनगर, अहिल्यानगर(फरार) याचे सांगणेवरुन करत असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, एच. पी. गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधुन व्यवसाईक गॅस टाक्यामध्ये रिफिंलिंग करतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द तोफखाना पो. स्टे. गु. र. नं. 201/2026 भारतीय न्याय संहिता कलम 223, सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7, सह एल.पी.जी. (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.




