ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीपाद छिंदमला महानगरपालिकेच्या सभागृहातून बाहेर हाकलल्यानंतर छिंदमचा गंभीर आरोप

अहिल्यानगर

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त ठरलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभे राहताच इतर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला.

त्यानंतर सभेतील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. श्रीपाद छिंदम हा नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम याने प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर नगरसेवकांनी त्याला बोलू देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला. यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अखेरीस श्रीपाद छिंदमला सभागृहाबाहेर काढण्यात आलं.

या गोंधळादरम्यान काही नगरसेवकांनी श्रीपाद छिंदम समोर असलेला माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद फेकून दिल्याचीही घटना घडली. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. छिंदम सभागृहात उपस्थित राहत असला तरी त्याच्या सहभागावर आक्षेप घेतला जात असल्याचं चित्र दिसत आहे.

अपक्ष नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी मात्र वेगळा आरोप केला आहे. सभेत आपण बजेटच्या विरोधात भूमिका घेतली आणि अंदाजपत्रक चुकीचे असल्याचे मांडल्यामुळे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित करून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्याकडे दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्याने शहराचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर टीका करत, ‘आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आमदार जगताप आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक जबाबदार असतील’ असा गंभीर आरोप केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे