ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शेअर ट्रेडिंग’च्या आमिषाला बळी पडून तब्बल 1 कोटी 31 लाख 65 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील एका शिक्षकाची ऑनलाईन ‘शेअर ट्रेडिंग’च्या आमिषाला बळी पडून तब्बल 1 कोटी 31 लाख 65 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरूध्द शनिवारी (21 मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूकृपा हौसिंग सोसायटी, साताळकर हॉस्पिटलजवळ, अहिल्यानगर येथे राहणार्‍या 56 वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. ते मार्कंडेय विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर ट्रेडिंगबाबत जाहिरात प्राप्त झाली. अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधितांनी त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.

या ग्रुपमधील अ‍ॅडमिन दीपा रसीमाने हिने गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला.

तिच्या सांगण्यावरून फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी तसेच बहिणीच्या बँक खात्यांतून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी मोठ्या रकमा ट्रान्सफर करण्यात आल्या.

27 नोव्हेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत फिर्यादी यांनी स्वतःच्या खात्यातून सुमारे 77 लाख 45 हजार रूपये, मुलाच्या खात्यातून 8 लाख 90 हजार रूपये, मुलीच्या खात्यातून 1 लाख 30 हजार रूपये, पत्नीच्या खात्यातून 30 लाख रूपये तसेच बहिणीच्या खात्यातून 14 लाख रूपये अशी एकूण 1 कोटी 31 लाख 65 हजार रूपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा केली.

दरम्यान, गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची वेळ आल्यानंतर आरोपी महिलेने आणखी पैसे भरण्याची मागणी केली. यानंतर संशय आल्याने फिर्यादीने संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क तुटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर (हेल्पलाईन 1930) तक्रार नोंदवली तसेच येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विविध बँक खात्यांचा वापर करून रक्कम वळवली असल्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरूआहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे