ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली स्नेहिता संघम व निमा वुमन्स फोरम संयुक्त महिला दिन निमित्त कॅन्सर शिबीर संपन्न

अहिल्यानगर

पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे महिलांसाठी नेहमीच वेगकाळे उपक्रम घेण्यात येतात..यंदा ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त कॅन्सर जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

दिवसें दिवस जनतेत विशेषतः महिलांमधे स्तनांचा कर्क रोग वाढतांना आढळत आहे. त्यामुळे महिलांनी या विषयी जागृत रहावे म्हणून या शिबीराचे आयोजन करण्यात आहे.

यावेळी अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ, डॉ. अंशु मुळे, डॉ. मानसी कांबळे यांनी कॅन्सर ची कारणे, लक्षणे व उपचार याविषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी डॉ. कांचन रच्चा यांनी HPV. व्हॅक्सीन (लस) त्याचे असेस वयानुसार कसे घ्यायचे, हे सविस्तर सांगितले.. कॅन्सर बरा होतो ..जेंव्हा तो पहिल्या स्टेजला असतो, तो कसा ओळखावा, ही माहिती देऊन स्त्रीयांनी प्रत्यक्ष स्व तः स्तन तपासणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

तसेच सर्व महिलांनी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी मोफत करण्यात आली.

डॉ.अंशु मुळे, डॉ. मानसी कांबळे, डॉ. कांचन रच्चा, डाॅ. रत्ना बल्लाळ, डॉ. प्रेरणा छिंदम, डॉ. प्रांजल आडेप, डॉ. प्रिती सुरकुटला यांनी महिलांची तपासणी केली.

जवळ जवळ १०० महिलांनी शिबीराचा लाभ घेतला..

उपाध्यक्षा रेखा वडेपली, सचिव सपना छिंदम, पूनम वन्नम, साधना कोल्पेक, नीता बुरा, विजया गुंडू, प्रमिला वन्नम, सविता एक्कलदेवी, आरती छिंदम, सरोजा गुडा, रोहिणी पागा, कांचन कुंटला, कल्पना बुलबुले, सविता कोटा, रेखा गुरुड, ऐश्वर्या अंकाराम, सविता येनगंदूल, निर्मला गुंडु, सरु रच्चा, लक्ष्मी गुंडू, चिलका प्रमिला यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे