ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भावाने केला अत्याचार

शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय 13) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मावस भावाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुरूवारी (5 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐतिहासिक स्थळे

फिर्यादी मुलीची आई चार वर्षांपूर्वी मयत झाली असून वडील मजुरीसाठी बाहेर राहतात. त्यामुळे ती गेल्या चार वर्षांपासून मावशीकडे राहते.

दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये दुपारी फिर्यादी मुलगी घरी एकटी असताना तिच्या दुसर्‍या मावशीच्या लहान मुलाने तिला त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलावले. ती त्यांच्या घरी गेल्यानंतर घरात संशयित आरोपी मावस भाऊ हा एकटाच होता. मुलगी स्वयंपाक करत असताना संशयिताने मागून येत तिला मिठी मारून जबरदस्तीने जमिनीवर पाडले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.पीडित मुलीने विरोध केल्यावर संशयित आरोपीने तिला मारहाण केली तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र बुधवारी (4 मार्च) मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब मावशीला सांगितली. त्यानंतर तिला उपचारासाठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यानंतर पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मावस भावाविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. तो अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे