ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडीत आकाशवाणी केंद्रासमोर महिलेचा विनयभंग

अहिल्यानगर

शहरातील आकाशवाणी केंद्रासमोर अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणाऱ्या कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.​

महानगरपालिकेच्या खासगी कंत्राटानुसार अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करण्यासाठी तक्रारदार महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री त्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसह प्रोफेसर चौक भागात गस्तीवर होत्या. यावेळी आकाशवाणी केंद्रासमोरील एका मोबाईल दुकानासमोर एक मोपेड दुचाकी रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी असल्याचे त्यांना दिसले. वारंवार सूचना देऊनही संबंधित तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केले. ​

जेव्हा महिला कर्मचाऱ्यांनी ती दुचाकी टोईंग वाहनावर उचलण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने संतापून तक्रारदार महिलेचा विनयभंग केला.

या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे