ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बुकिंग करूनही जर तुम्हाला गॅस मिळत नसेल तर इथे करा तक्रार, हेल्पलाईन क्रमांक

अहिल्यानगर मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान घरगुती गॅसच्या (LPG) तुटवड्याने नागरिक हैराण झाले आहे. एकीकडे सरकार गॅस टंचाई नसल्याचा दावा करत असताना बुकिंग करूनही अनेकांना गॅस मिळत नसल्याचे समोर येत आहे.

अनेक ठिकाणी जनतेत मोठी ओरड आहे. भल्या पहाटे पाच वाजेपासून एजन्सी कार्यालयाबाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही, एजन्सीने दिलेल्या क्रमांकावर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ओरड करण्यात येत आहे. वाढीव दर मोजा आणि चार पाच तास रांगेत थांबून गॅस मिळवा अशा कात्रीत ग्राहक अडकले आहेत. तुम्हाला जर बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नसेल तर या क्रमांकावर तक्रार करता येईल.

बुकिंगचा कालावधी वाढला

देशातील LPG सिलेंडरच्या बुकिंगचा कालावधी 21 दिवसांनी वाढून 25 दिवस करण्यात आला आहे. ग्रामीण ग्राहकांसाठी हा कालावधी 45 दिवस करण्यात आला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी तक्रारींचा ओघ आला आहे. काही गॅस डीलर सिलेंडर मुद्दाम उशीरा देत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. तर काही ठिकाणी एजन्सीचे डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैसे मागत असल्याची ओरड होत आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी वेळेत मिळत नसल्याचे, डीलर मनमानी करत असल्याचा आरोप

HP गॅस हेल्पलाईन क्रमांक

HP गॅस च्या ग्राहकांना तक्रार करण्यासाठी या क्रमांकावर संपर्क कराता येईल.1800-2333-555 (टोल फ्री) 9493602222 (HP Anytime LPG)

भारत गॅससाठी हेल्पलाईन क्रमांक

भारत गॅस ग्राहक सिलेंडर बुकिंगची तक्रार खालील क्रमांकावर करू शकतात.1800-22-4344 (टोल फ्री) 7715012345 (LPG बुकिंग)

इंडेन गॅस ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांक.Indane Gas च्या ग्राहकांना या क्रमांकावर तक्रार करता येईल.1800-2333-555 (टोल फ्री).7718955555 (बुकिंग आणि तक्रार )

व्हॉट्सॲप असे करा बुकिंग

इंडेन: अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक 77189 55555 वर बुकिंगसाठी मॅसेज पाठव. ग्राहक WhatsApp वर मॅसेज पाठवू शकतात. LPG रिफिल असा संदेश लिहून गॅस बुकिंग करा. यावर सर्व अपडेट समोर येईल.

ग्राहकांना ही सुविधा 24/7 उपलब्ध आहे. या आधारे पुढील प्रक्रिया सहज पूर्ण करता येते. पेमेंटही करता येते. ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे