ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

पुण्यातील ५ तरुणांनी घेतला अपरिचित भुयारांचा वेध

पुणे

पुण्यातील ५ तरुणांनी घेतला अपरिचित भुयारांचा वेध

जय शिवराय मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण दरवेळेस नवीन ठिकाणची माहिती घेत असतो, आज आपण अशा एका ठिकाणची माहिती घेणार आहोत जी या आधी परिचयात आली नाही. हे ठिकाण म्हणजे मावळमधील तुंग किल्ल्या च्या डोंगर पायथ्याला ही ४ भुयारे आहेत. या पैकी एका भुयार पाहण्याचा या तरुणांनी प्रयत्न केला. त्या साठी त्यांनी पूर्ण काळजी पूर्वक आणि अभ्यासपूर्ण तयारी केली होती.

किल्याच्या पायथ्या पासून हे भुयार अंदाजे १०० फूट उंचीवर आहे. तिथ पर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे थोडी मशकत करावी लागते. झाडे वाढल्यामुळे ही ठिकाण कोणाच्या लक्ष्यात येत नाही. वर गेल्यानंतर आपल्याला एक रांगेत काही अंतर सोडून ४ भुयारे पाहण्यात येतात. त्यामधील ३ भुयारे हे झाडांमुळे तर काही भुयारे हे दगड माती मुळे बंद झाल्याचे दिसतात. परंतु या पक्की एक भुयार ही बऱ्या पैकी चांगल्या अवस्थेत आहे.

या ४ ही भुयाराचे तोंड हे २ × ३ फूट असे आहे. ४ पैकी १ भुयार हे अंदाजे १५० फूट व त्या पेक्षा अधिक आता पर्यंत रुंद आहे. या भुयारामध्ये जाताना आपल्याला गुडघ्याच्या आधारे रांगत जावे लागते. जसे जसे आत जाऊ तश्या आपल्याला आतमधील वेग वेगळ्या वास्तु पहायला मिळतात. भुयारात मध्ये दोन अंदाजे ३० X ४ च्या मोठ्या खोल्या आपल्याला पहायला मिळतात.

या भुयारा मध्ये आपल्याला काही पायऱ्यांचे, खोल्यांचे अवशेष तर दगड तासून तयार केलेल्या भिंतींचे अवशेष पहायला मिळतात. त्याच प्रकारे आपल्याला आत गेल्यावर विविध प्रजातीचे रंगबेरंगी बेडके, कीटके पहायला मिळतात त्याच प्रकारे आपल्याला सायाळ ,जंगली रानडुकर, वटवाघूळ यांचा वावर या ठिकाणी असेलले दिसून येते.

दगडांमधून पाझरणारे पाणी आणि भुयारात पडलेली माती मुळे आत एक प्रकारची तळे आणि दलदल झालेली दिसून येते.

त्यामुळे हे तरुण असे देखील सांगता की हे भुयार पाहणे खूप अवघड आहे त्यामुळे संपूर्ण तयारी, अनुभव आणि अभ्यास असल्यास या भुयारा मध्ये जाणे अन्यथा हे टाळावेच. हे सर्व तरुण अनुभवी असल्यामुळे त्यांनी या भुयाराचा वेध घेतला आहे.

भुयाराच्या आतील काही छायाचित्र आणि तिथे गेलेल्या तरुणांची नावे – आशिष मराठे, दत्ता जोर, विकास गोविलकर, राहुल दिवटे, अभिजीत भुजबळ.

श्री. अभिजीत का. भुजबळ

9764085025

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे