ब्रेकिंगमहाराष्ट्र
मनोज जरांगेचं उपोषण सुटलं

सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा… सरसकट आरक्षण द्या… यासाठी आवश्यक ते अभ्यास करून अहवाल देण्यासाठी सरकारला वेळ देणार, असे जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले.
मोसंबीचा रस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. याआधी त्यांनी आरक्षण दिलं नाही तर मुंबईचं नाक बंद करणार असा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. त्यांनी सर्वांची दिवाळी गोड व्हायला पाहिजे असे म्हणत उपोषण सोडले.