ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शेवगावमध्ये लॉजवर आढळल्या पुन्हा ३ बांगलादेशी तरुणी, पोलिसांची मोठी कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गेवराई रस्त्यावरील हॉटेल राजयोग लॉज येथे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून महिलांच्या अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत लॉज मालकासह सहा जणांविरुद्ध स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ तरुणींची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे या तरुणी बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे.

वानवडी (पुणे) येथील फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते स्टीफन देविदास मस्कनळी यांना अहिल्यानगर जिल्ह्यात देहव्यापारासाठी एजंटांच्या मार्फत काही बांगलादेशी तरुणी आणल्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी अहिल्यानगर मध्ये येवून पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत ही माहिती त्यांना दिली.

पोलिस अधिक्षक घार्गे यांनी तात्काळ नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक हमीद शेख तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

या आदेशानुसार पो.नि. शेख यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील स.फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, महिला पो.कॉ. छाया रांधवन यांच्या पथकासह बुधवारी (दि.४) सायंकाळी शेवगाव गाठले, तेथील हॉटेल राजयोग लॉज येथे एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि छापा टाकला.

यावेळी त्या लॉज मध्ये ३ तरुणी आढळून आल्या. त्या बांगलादेशी असल्याचे चौकशीत समोर आले. पथकाने त्यांना ताब्यात घेत लॉज मालक बाबासाहेब रामभाऊ अंधारे, अजिंक्य विठ्ठल अंधारे (रा. शिवनगर, शेवगाव), अमोल पठाडे (रा. नेवासा) आणि अमर मारुती ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) कृष्णा बापू झिरपे (रा. कोळगाव, ता. शेवगाव), प्रतिक मिलिंद रांधवणे (रा. माळीवाडा, शेवगाव) यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १४१, १४३ (३) सह स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाजीराव सानप हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक गणेश उगले, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हमीद शेख, यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील स.फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, महिला पो.कॉ. छाया रांधवन यांच्या पथकाने केली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे