ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मूळचंद ग्रुपला १३.४८ कोटींचा दणका..

पुणे

मूळचंद ग्रुपला १३.४८ कोटींचा दणका ९,५०० कर्मचाऱ्यांचा पीएफ बुडवल्याचा ठपका.. ६० दिवसांत पैसे भरण्याचे भविष्य निर्वाह निधी प्रशासनाचे आदेश

पुणे येथील भविष्य निर्वाह निधी (EPFO) प्रशासनाने पुण्याच्या मूळचंद ग्रुपमधील ‘मूळचंद अँड कंपनी’ आणि ‘मूळचंद सर्व्हिसेस’ या दोन कंपन्यांविरुद्ध मोठी दणकेबाज कारवाई केली आहे. तब्बल ९,५०० हून अधिक कामगारांना पीएफच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत, प्रशासनाने या कंपन्यांना १३ कोटी ४८ लाख रुपये ६० दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी ही कारवाई केली असून, वेळेत पैसे न भरल्यास मालमत्ता जप्ती आणि दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

तपासणी दरम्यान असे समोर आले की, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगाराची आकडेवारी चुकीच्या पद्धतीने दाखवून आणि पगाराचे तुकडे पाडून  त्यांना पीएफच्या कक्षेबाहेर ठेवले होते. माजी कर्मचारी रमेश नारायण धुमाळ यांच्या तक्रारीनंतर या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. दरम्यान, मूळचंद ग्रुपने या आदेशाचा कायदेशीर अभ्यास करून पुढील पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे. या कारवाईमुळे कामगारांचे शोषण करणाऱ्या इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे