ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमध्ये वीज मीटर बसवून देण्यासाठी १५ हजारांची लाच ,वायरम एसिबीच्या जाळ्यात

अहिल्यानगर

भिंगार येथील महावितरण कार्यालयात कार्यरत बाहयस्त्रोत वायरमन अजय प्रल्हाद चाबुकस्वार (वय ३४) याने वीज ग्राहकास वीज मीटर बसवून देण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे राहते घरातील वीज मीटर वायरमन चाबुकस्वार यांनी टेस्टिंगसाठी काढून नेले होते. हेच वीज मीटर पुन्हा बसविण्यासाठी त्याने १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने २७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर कार्यालयात तक्रार दाखल केली.

२८ जानेवारी रोजी झालेल्या पडताळणी दरम्यानही चाबुकस्वार याने पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र लाच स्वीकारली नव्हती, याबाबत कायदेशीर अभिप्राय मागविण्यात आला होता. तो प्राप्त झाल्यावर ४ सप्टेंबर रोजी लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे, अंमलदार चंद्रकांत काळे, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे